Wednesday, 28 December 2011

तू...

तू ...
प्रसंग - एक


आता तू बसली असशील
त्याची उघडी पाठ बघत
निळ्या अंधारात
रडावस वाटेल तुला पण
थांब रडू नकोस .
कुशीत घेताना त्याने,
तुला भरून येइलही एकवेळ
पण रीतं होण्याची `सम'
तुला माहितीये तू कुठे विसरलीयेस ते.
वादळ शमल्यावर देहांच
तू तुझ्या आत बघशील
तुला काहीही शिल्लक दिसणार नाही.
त्याची फिरालेली पाठ बघताना
निळ्या ढगांचा थवा उतरताना दिसेल
त्याचा पाठीवर
तू बोटं फिरवशिलही
पण कुठलीच नक्षी उतरणार नाही,
झोपेच्या प्रयत्नात तुझी रात्र उतरेल,
ओसरेल तुझ्यावरून....


तू ...
प्रसंग - दोन


सकाळी दारावरची बेल वाजते. रेश्मा पातेल घेउन दार उघडते.
नुकताच झोपेतून  उठलेला टवटवित चेहरा पाहून
भैया खुश होतो. आज एक तारीख आहे हे विसरून परत जातो.
त्याच्या मनात एक प्रश्न घुटमळतो...
``बिन नहाये फूल खिला है , क्या नहाये चाँद खिलेगा ..?'' 

Wednesday, 3 August 2011

गारयाने माखलेला उजवा तळपाय
जेव्हा मी डाव्या मांडीवर ठेउन बैठक मरतो 
तेव्हा काहीतरी लिहिलेच पाहिजे असे नाही.
   "  मग आता काय करतो आहेस ?"
अस्सच, हातात पेन नि मांडीवर वही असली की काहीतरी खरडायच
आणि खरडलेले आयुष्य सावरायचा एक प्रयत्न करायचा.  

Tuesday, 2 August 2011

उंच आकाशी भासणारा मी तुला 
तू सतत कुशीत विसावा घ्यायचीस 
कुशीत माझ्या  माझ आकाश 
शोधयाचिस नि भोगय्चिस 
आणि रोज भेटी-गाठी च्या क्षणी 
क्षणभर विश्रांति म्हानायचिस.
...............................................
उलटून जायची संध्याकाल केव्हा 
एकमेकांचा भार पेलताना सोसताना 
पाश मात्र सुटतच नसायचे 
एकमेकाना आवळलेले.
सगळ आवरून झाल्यावर मग तू म्हानायचिस,
"अरे स्वताला expose कर"
तू कोण आहेस हे तू जगासमोर आन 
मी तुला मदत करते.
............................................
"पण माझ आकाश वेगळ होत"
मी माहि म्हणायचो. 
तसा आकाशी भासणारा मी तुला 
तुझ्या गणितापसुन दूर वाटायचो.
मग तुझ्या मनात आकडेमोड सुरु व्हायची 
अपेक्षांची-गरजांची, जनिवांची-उनिवांची 
आणि गुनायचिस माझ्या जनिवंiना माझ्या उनिवांसकट
तेव्हा बाकि शुन्य उरते हे पाहून,
............................................
मग तू धरलास सोपा रस्ता 
पडून जाण्यासाठी (कुणापासून? कुणासाठी? आणि  कुणाकड़े??)
.........................................
पण तुला अजुन का कळलेल नाही?
आताशा आयुष्य सुरु व्हायचय. 
................................................
चुम्बने सतत दिली- घेतली 
पसरवली- आवरली 
अंगभर- शिवारभर   
जेथे होतो त्या जागेभर,
अगदी उतू -उतू गेली 
एवढ सगड़ आसताना 
शुन्य बाकि दिसल्यावर फसली,
तिथेच चुकली 
आणि नेमक लक्षात ठेवायला विसरली,
१/० बरोबर शुन्य नव्हे , १/० म्हणजे http://t1.gstatic.com/images?q=tbn:ANd9GcR_e0UNkQh6PIetwWYw1_ewOJMKShdfDCReBIrLHfEObsbNT9WH इनफिनिटी,  
हीच माजी इनफिनिटी.
तुझ्या गणिता पलिकडच गणित तुला कधीच कळल नाही. 
........................................
पण लक्षात ठेव ,
कोरड्या काड्याची आग मोठी दिसते - भासते,
लवकर खाक होते,
ओल्या लाकडाच्या आगिसारखि 
त्याची 'धग' नसते.

         जोहंती पाटिल, गन्पुरकर.