Thursday, 7 October 2021

 


पुन्हा - पुन्हा प्याले भरा,
पुन्हा - पुन्हा चिअर्स करा,
पुन्हा - पुन्हा तेच ते ,
अस काही avoid करा.

पुन्हा - पुन्हा प्याले भरून,
पुन्हा - पुन्हा नव्या गोष्टी,
नव्या- नव्या आनंदाला,
नवीन-नवीन तोंडे उष्टी.

पुन्हा - पुन्हा प्याले अर्धे,
पुन्हा - पुन्हा  त्याच कथा,
अर्धा भरला अर्धा रीता,
प्यासा सावनची उर्वरित गाथा.

पुन्हा - पुन्हा  प्याले रिकामे,
पुन्हा नाही भरणार कधी,
सकाळ झाली प्याला कंडला,
संध्याकाळ उतरेल प्याल्यात आधी. 

-Dr. प्रवीन करंदीकर.